महाराष्ट्र

5 Reasons To Watch Chhaava: ‘छावा’ का पाहावा? ‘ही’ 5 कारणं, म्हणून ‘हा’ चित्रपट पाहायलाच हवा!

5 Reasons To Watch Chhaava : विक्की कौशलच्या ‘छावा’नं रिलीज होताच, इतिहास रचला आहे. फिल्म 205 ची सर्वात मोठी ओपनर ठरली आहे. पण, तुम्ही ‘छावा’ का पाहावा? 5 कारणं जाणून घ्या…

5 Reasons To Watch Chhaava : विक्की कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ चित्रपट (Chhaava Movie) सध्या चर्चेत आहे. रिलीज होताच ‘छावा’नं (Chhaava) मोठी मुसंडी मारली आहे. विक्कीनं त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिलेत, तर, त्याच्या दमदार अभिनय कौशल्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे. सध्या विकी कौशल ‘छावा’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. ‘छावा’मधून विक्कीनं स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. सध्या ‘छावा’नं 2025 मधील सर्वात मोठ्या ओपनरचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. फक्त या वर्षातीलच नव्हे, तर ‘छावा’ आता विक्की कौशलच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा ओपनही ठरला आहे. पण, ‘छावा’ चित्रपट आवर्जुन का पाहावा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याची 5 महत्त्वाची कारणं जाणून घेऊयात…

‘छावा’ का पाहावा?

‘छावा’ ही हिस्टॉरिकल एपिक ड्रामा फिल्म आहे. असं म्हणता येईल की, हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि 31 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटात अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे तो थिएटरमध्ये पाहणं आवश्यक आहे.

विक्की कौशलचा दमदार अभिनय

विक्की कौशल ‘मसान’ (2015), ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ (2019), ‘सरदार उधम सिंह’ (2021) सारख्या भूमिकांमध्ये खोलवर उतरण्यासाठी ओळखला जातो, पण ‘छावा’मध्ये त्यानं त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे, केवळ कवच घालणं आणि तलवार चालवणं असं नाही. या भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी विक्कीनं अनेक महिने कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. त्यानं आपल्या दमदार अभिनयानं या भूमिकेत जीवंतपणा आणला आहे. ज्यांनी पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहिला, त्यांनी विक्की अभिनय, संवाद आणि अॅक्शन सीक्वेन्स पाहून अंगावर काटा आल्याचं सांगितलं. अनेकांनी याला विक्कीचा अवॉर्ड विनिंग परफॉर्मेंस असं म्हटलं आहे.

मराठा राजा अन् मराठ्यांच्या योद्ध्याची कहाणी रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांजी किर्ती जगभरात पोहोचलीय. त्यांच्या युद्ध चातुर्याचे धडे तर अनेक जागतिक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात गिरवले जातात. पण, छत्रपती शिवरायांचे पराक्रम पुत्र छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबाबत अनेकांना अद्यापही पाहिजे तेवढी माहिती नाही. नेमकं हेच ‘छावा’ आपल्याला सांगतो. ‘छावा’ संभाजी महाराजांच्या लष्करी कौशल्य, राजकीय रणनीती आणि वैयक्तिक त्यागावर खोलवर प्रकाश टाकतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या आणि मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची किर्ती माहीत करुन घेण्यासाठी ‘छावा’ एकदातरी पाहायलाच हवा.

‘छावा’तील जबरदस्त डायलॉग्स अंगावर शहारे आणतात… 

“फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की…” आणि “मौत के घुंघरू पहनके नाचते हैं हम…” असे जबरदस्त डायलॉग्ज अंगावर काटे आणतात.

शानदार स्टारकास्ट

‘छावा’तील स्टारकास्ट तुम्हाला चित्रपट संपेपर्यंत खिळवून ठेवते. ज्यामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि महाराणी येसूबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदाना यांचा समावेश आहे. ज्यांनी या पात्रांना जिवंत केलं आहे.

शानदार व्हिज्युअल्स आणि जबरदस्त म्युझिक

‘छावा’ चित्रपट खूप प्रेमानं आणि अचूकतेनं बनवला गेला आहे, असं दिसतं. त्यातील शानदार युद्ध सीन्स आणि प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना ऐतिहासिक कथेत खोलवर घेऊन जाते. आणि मग ए.आर. रहमानचं म्युझिक हा चित्रपटाचा आत्मा आहे. तनामनात जोश जागवणारी गाणी थेट तुमच्या काळजाला हात घालतात.

लक्ष्मण उतेकरांचं उत्तम दिग्दर्शन 

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबाबत असं म्हटलं जातंय की, त्यांच्या कथा सांगायची आणि खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. त्यांचे यापूर्वीचे चित्रपट  ‘मिमी’ (2021), ‘जरा हटके जरा बच्चे’ (2023) आणि ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ (2024) सारख्या चित्रपटांमध्ये दिसून येते. ‘छावा’ मध्ये त्यांनी ऐतिहासिक भव्यतेला भावनिक क्षणांशी जोडलं आहे. ज्यामुळे कथा युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन मनाला भिडते. छावाचा प्रत्येक सीन पाहिल्यानंतर तुम्ही दिग्दर्शकाची वाहवाह केल्याशिवाय राहत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!